आम्ही दोघं ,आमचे दोन (धरून एक गोजिरा श्वान),
मखरातले गणपतीचं आम्ही, हव्वा तसाच मान,
कसाही असो अमुचा वकूब, पाहिजेत सदैव लाईक्स अन कौतुक,
नाचा धरुनी फेर अमुच्या भवती, नका काढू मात्र एक चूक,
तुम्ही हवं सदैव खाली, नम्र; नको आमुच्यापुढे ताठा कधी,
मारू अनुल्लेखाने, अन्यथा धरू मौनव्रत कधी,
कोणी ज्येष्ठ शिकवेल आम्हा गोष्टी शहाणपणाच्या चार,
साठी बुद्धी नाठी म्हणोनि फिस्सकन हसू तोंडावर
नातलग-मित्रगण क:पदार्थ, परप्रकाशी ग्रह-गोल तुम्ही,
अमुच्या लिमिटेड सूर्य-मालिकेतील तेजोमय सूर्य आम्ही!
- प्रशांत