Total Page-Views

Sunday, October 12, 2025

आठवणींचा kaleidoscope (३)

१९८१-८२ ...  जिल्हा परिषद प्रशाला, तुळजापुर. गाव तेंव्हा खुप लहान होतं. आज दिसते तशी गर्दी बिलकुल नव्हती. १०वी चं शालेय वर्ष सुरु होतं. माझा अभ्यास जोरात सुरू होता. Prelim. exam. (सराव परीक्षा!)मधे मला ८९% टक्के मार्क्स पडले  होते. मी  लिहिलेला  मराठी निबंध आमच्या . . प्रयाग सरांनी वर्गात साऱ्या  मुलांसमोर  वाचून  दाखवून माझं खूप कौतुक  केलं होतं; मी राज्यात पहिला  (किमानपक्षी बोर्डात तरी) येईन अशी त्यांना ( थोडीशी  मलाही) अपेक्षा होती! वार्षिक परीक्षा  जवळ आली  होती. मला आठवतंय, रंगपंचमीच्या दुस-या  दिवसापासून परीक्षा  सुरु  होणार होती. पहिला  पेपर  मराठीचा होता. मी  रंग-पंचमीदिवशी सालाबादाप्रमाणे रंग खेळता (! 😊) घराच्या  माडीवरून  अभ्यास करता-करता खाली रावळगल्लीत रंग-पंचमीचा  चाललेला जल्लोष पाहत होतो! मराठीचा  तसाही  अभ्यास  काही फार नसतो; आपला अभ्यास  झालेला आहे, असं वाटून आश्वस्तही होतो!

परीक्षेचा  दिवस  उजाडला. मी  देवाच्या, आईच्या पाया पडून निघालो. शिंदे  हायस्कुल मध्ये नंबर आला होता. Hall ticket वगैरे दाखवून वर्गात बसलोघंटा वाजली, पेपर हातात पडला.आणि  कसं  कोण  जाणे , पण  मी आधी निबंध लिहिण्याचं  ठरवलं! आता विषय आठवत  नाही पण एवढं  लख्ख आठवतंय  कि अगदी  खनपटीला बसलो होतो की, काही  तरी  फार  भारी  उपमा , अलंकार , दोन ओळींच्या यमकात बसणा-या सुरेख काव्यपंक्ती सुचतील... पण  कसलं काय! इतर वेळेसअगदी  हुकमी कविता लिहिणारी माझी  प्रतिभा  (?!) माझ्यावर पुर्णत: रुष्ट  झाली  होती. (नाही; मी लेखक /कवी  नाही  याची  मला  पूर्ण  कल्पना आहे; पण  त्या  condition ला  'writer's block' म्हणतात हे मला - वर्षांपूर्वी  कळलं!)असा बराच  वेळ गेला असेल  प्रतीक्षेत; अर्ध्या-पाऊण  तासाने  मला  जरा  भान  आलं, "प्रशांत, आता  काही  तरी खरडून निबंध  पूर्ण  कर बाकीचे  प्रश्न सोडवायला घे लवकर".. भरभर  लिहून  सर्व प्रश्न attempt केले ; पेपर संपला

माझं  मन  सांगत  होतंच की पेपर काही  चांगला  गेला  नाही.. पण  ते  फारसं मनाला  लावून घेता बाकीचे पेपर्स  दिले; छान  गेले होते

Result लागला! गुण-पत्रिका  हातात घेतली, मराठीत फक्त ६० मार्क्स  पडले होतेज्याच्यामुळे बाकीच्या विषयात खूप चांगले मार्क्स पडूनही (गणित १४९/१५०, इंग्रजी ८९/१००, विज्ञान  १४०/१५०)  average ८५% झाले. जे  नक्कीच माझ्या अपेक्षेपेक्षा  खूप कमी होते. राज्यात पहिला  काय,बोर्डात  पहिल्या

३० विद्यार्थ्यातही आलो  नव्हतो! नाराज  नक्कीच  झालो  होतो  पण निराश नाही!

..आता चार दशकानंतर मागे वळून पाहताना वाटतं; झालं ते  बरंच  झालं!चुकून-माकून आपण  राज्यात १०वे-१२वे  आलो  असतो  (इथेही  मी  पहिला  वगैरे  म्हणत  नाही हं 😊) तर ते यश  मला  झेपलं  असतं कामाझे  पाय जमिनीवर  राहिले असते का? दहावीतील  यशाने  हुरळून  जाऊन मी १२वीला आपटी  खाल्ली  असती का

हे  थोडंसं  "द्राक्षे  आंबट  आहेत" असं  म्हणण्यासारखं आहे याची मला  कल्पना  आहे.  But if I understand myself correctly, may be, I was not that level-headed in my childhood so it was a blessing in disguise!

(खूप वर्षानंतर, अमेरिकेत  सिलिकॉन व्हॅली  मध्ये, न्यूयॉर्क मध्ये वगैरे SAP projects मधे काम  करताना कळलं की बोर्डात आलेल्या (अगदी पहिला ) वा  IIT/IIM मधून  pass out झालेल्याना शिंगे नसतात, ते  आपल्या  सारखेच असतात आणि  त्यांच्या तुलनेत आपण स्वतःला जेवढे समजत होतो तेवढेहीगल्लीतले बॅट्समननाही आहोत! किंबहुना, -याच बाबतीत सरसही

..असो! तर दहावीच्या परीक्षेतील अपेक्षा-भंगाचं दुःख काही दिवसातच मागे  पडलं  होतं. आता ११वी/१२वी  साठी  तुळजापूर  सोडून  बाहेर पडायचं होतं. डॉक्टर किंवा  इंजिनियर (तेही Govt college मधुनच) असे  दोनच पर्याय  असण्याचा  काळ (आणि मध्यमवर्गीय परिस्थितीहोता तो! सोलापूर खुणावत होतं.. (तेंव्हा ते महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर होतं!) 

आणि जून १९८२ च्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाबरोबर  (कै. प्रफुल्ल) आम्ही सोलापूरला जाण्यासाठी एस.टी. पकडलीगादीची वळकटी, टपावर ठेऊन  आणलेली जुनी सायकल, प्लॅस्टिकची मोठी बादली  आणि छोटी सुटकेस (   प्रयाग सरांनी  'शाळेत पहिला  आला म्हणून बक्षीस' दिलेल्या ५१ रुपयातून  घेतलेली) हा जामानिमा घेऊन सोलापूर बस-स्टॅण्ड वर उतरलो!…

घर सोडून  होस्टेल मध्ये राहायचंय, सोलापुरातील हुशार मुलांबरोबर स्पर्धेत निभाव लागेल का, याबद्दल मनात थोडी भीती होती, हुरहुर होतीआणि डोळ्यांत स्वप्नं!! 

 

 

 

-प्रशांत