Total Page-Views

26789

Tuesday, March 11, 2025

असावे घरटे अपुले छान

 


एक छोटीशी चिमणी जास्वंदाच्या झाडाच्या एका फांदीशी झोंबत होती, खूपदा त्याच फांदीवर येत होती. - दिवसांनी मला कळलं की घरटे बांधणे चालू आहे!

वसंत ऋतू आलेला आहे; नवचैतन्याचा ,सृजनाचा निसर्गोत्सव! पावसाळ्याआधी घरटे बांधून पिल्लास जन्म देण्याचं नियोजन असावं चिमणीबाईंचं! (का ते चिमणराव असतील लग्नाआधी 1BHK ready करणारे:-?)

कुठून-कुठून शोधून नेमक्या स्वरूपाची काडी , काटकी , कापसासारखं तंतुमय असं काही तरी आणि बरंच तत्सम building material चोचीत पकडून आणायचं ते कमालीच्या चातुर्याने विणत / गुंफत घरटे बांधायचं! आणि हे असं -१० दिवस उडत-उडत बांधकाम पूर्ण करत असताना एक कान (?) सदैव धोक्याकडे (पक्षी - माणूस , दुसरा पक्षी , मांजर .) कडे ठेवायचा; जरा खुट्ट वाजलं की भुर्रकन उडून जायचं, धोका नाही आहे याची खात्री झाली की परत येऊन 'काम चालू'!

वाटलं, पक्षी आपल्या पिल्लांना उडायला शिकवतात, हे माहित होतं. पण असं घरटे बांधायला शिकवत असतील का? की ते कौशल्य उपजतच असतं?

पक्ष्यांचं homing instinct तर केवळ विस्मयकारक असतं. बहुसंख्य पक्षी आपल्या घरट्याच्या -५किलोमीटर परिघात (माझा अंदाज बरं का!) बागडतअसतील संध्याकाळी आपापल्या घराकडे परतत असतील. पण सैबेरियातील , कझाकस्तानातील हिमवर्षावाची जीवघेणी थंडी टाळण्यासाठी तेथील पक्षी (उदा: फ्लेमिंगो) हजारो किलोमीटरअंतर कापून भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात अॅाक्टोबर ते मार्च दरम्यान येतात (पुण्याजवळील भिगवणमधे आगमन असतं हजारोंचं) कांही महिन्यांनंतर परत (जेव्हा तिकडची थंडी कमी होते) हजारो किलोमीटर अंतर कापत आपल्या मायभूमीकडे / घराकडे जातात. दिशेचं भान , रोज किती अंतर कापता येईल , कोठे /कोणत्या झाडावर मुक्काम करायचा , हे सगळे करताना रोजच्या अन्नाचीही तजवीज करायची! आणि हे सगळं अग्निदिव्य दरवर्षी स्वेच्छेने करायचं!! या नियोजनासाठी केवढा तरी हुशार मेंदू लागत असेल नां?

आणि मग, इंग्रजी मध्ये bird-brained idea (म्हणजे मूर्ख कल्पना) हा शब्दप्रयोग कसा काय आला असेल याचंच आश्चर्य वाटू लागतं!!

 

-प्रशांत


No comments:

Post a Comment