Total Page-Views

Friday, May 1, 2026

मायमराठी...!

परवा भाजी-मंडईत गेलो होतो. अर्थात सह! (कारण 'मला भाजीपाल्यातलं अजूनही का ही ही कळत नाहीअसं बायकोचं परखड मत!) तर कानावर  शब्द आले, "लौकी , लौकी ", दुसरीकडून "भिंडी , भिंडी" ची  हाळी  कानावर आदळली. भेंडी, आपण पुण्यनगरीतून थेट कानपुर/रामपुर मध्ये  गेलो की  काय असंच क्षणभर  वाटलं

केवढे आपले मराठी विक्रेते सर्वसमावेशक आहेत  नां? १५-२० टक्के परप्रांतीय ग्राहकांसाठी "लौकी , लौकी " म्हणत राष्ट्रभाषेचा लौकिक  वाढवत मातृभाषेला अलगद अडगळीत टाकलं

आता  मी  आपले मराठी पाणी-पुरीवाले (असतात नां :-?) गोलगप्पे वा फुचका असं नामांतर कधी करतील  याची  वाट  पाहतोय. मोदींनी  प्रसिद्ध  केल्यानंतर माझी खात्री  आहे की  कोणीझालमुरीनावाची टपरी काढली तर मराठी जनता तीच सर्वसमावेशक वृत्ती दाखवत  रांग लावून दुप्पट किंमत मोजतील त्या भेळ-पुरीसाठी

 आणि  हाच  मराठी माणूस जेंव्हा ग्राहकाच्या भूमिकेत  असतो  तेंव्हा नेपाळी वॉचमनशी, राजस्थानी/उप्र/बिहारी  किराणा/सुतार/प्लम्बरशी मोडक्या-तोडक्या हिंदीत  बोलून, पैसे मोजून स्वत:चं हसं करून घेत असतो! शिकेल की मराठी तो पर-राज्यातील माणूस, जर  तो पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आला आहे तर! आपण स्वाग्रही पाहिजे मातृभाषेसाठी

 आणि  उद्या  हेच  परप्रांतीय अमेरिका/कॅनडा/आखाती देशात  गेले  तर तेथील स्थानिक  भाषा  म्हणून इंगजी /अरेबिक शिकायचा प्रयत्न करतात नां स्वतःहून

When in Rome, be like Romans! 

मग इथे  कुठे  घोडं पेंड खातं हो?

आजकाल देवळात गेलात तर हनुमान चालीसा लिहिलेला बोर्ड दिसेल. (पेशवेकालीन मृत्यूंजयेश्वर मंदिरात सुद्धा) हनुमान चालीसाशी माझं  बिलकुल  वाकडं  नाही; पण  आहे  ना  आपल्या  मराठीत समर्थ  रामदासांचे   खणखणीत 'भीमरूपी  महारुद्रा...' !! 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता  विघ्नाची' वर विनाकारण 'सिंदूर  लाल चढ़ायो' ची  कुरघोडी होतेय! मला हिंदीविषयी  द्वेष , दुस्वास बिलकुल नाही; आदरच आहे त्या  भाषेबद्दल

कसं आहे नां; हिंदी  काय , इंग्रजी  काय , या आपल्या मातृभाषेच्या  भाषा-भगिनी  आहेत

पण मग एखादी मावशी  कितीही श्रीमंत/मोठी  असली तरी आपली आई  ती  आईच  असते  नां! तिचं विस्मरण कधी होता  काम नये , तिच्यावरचं प्रेम  कधी  कमी होऊ  नये , हीच इच्छा!

..आणि ते शक्य आहे जर आपण मराठीचा वापर टिकवला तर, वाढवला तर

पटतंय नां

मराठी वाचवा, मराठी वाढवा

म्हणजे काही अगदी प्रत्येकांने कथा-कादंब-या-कविता लिहाव्या अशी अपेक्षा नाही. पण स्मार्टफोनवर मराठीत टायपायला काय हरकत आहे? - दिवाळी अंक, वर्षाकाठी - मराठी पुस्तकं वाचायला, - मराठी नाटकं/चित्रपट पाहायला नक्कीच जमावं! जमेल तसे मराठी प्रतिशब्द संभाषणात आणणंही काही फार अवघड नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे

 ..अन्यथा पुढच्या २०-२५ वर्षातच मराठीचं रूपांतर, किंबहुना अध:पतनबोली भाषेतझालेलं असेल! ..जशी आज मालवणी, अहिराणी भाषांची गत झाली आहे!

 

जय मायमराठी, जय महाराष्ट्र!! 

 

 

 

-प्रशांत पिंपळेकर 

No comments:

Post a Comment