माझ्या वडिलांची आई,आम्ही मोठी आई म्हणत असू तिला. मी ५ वी -६ वीत असताना निर्वतली, पण बऱ्याच आठवणी मनाच्या kaleidoscope वर अजूनही तरळून जातात..
मोठी आई,.... गौर वर्ण, श्मश्रु केलेल्या डोक्यावर नेहमी असलेला पदर, अतिशय कृश, हातावरची, गळ्यावरची कातडी लोम्बायची वार्ध्यक्याने, पण अतिशय काटक!
काठी न घेता चालणं व स्पष्ट बोलणं! काही वेळेला तपकीर (नाशी ) वापरायची.
मी सर्वात धाकटा नातू., शेंडेफळ म्हणून मी तिचा फार लाडका होतो. प्रचंड सोवळं, अनसूट-पांसुट (शेवटच्या दोन शब्दांचा अर्थ मला अजून हि माहित नाही ! 😊 पण लहानपणी नेहमी घरी कानावर पडायचा) पाळणारी. पण मी मात्र तिची न घाबरता पप्पी घायचो व ती पण लटक्या रागाने 'चल मेल्या, कांदा खाल्लेल्या तोंडानं पप्पी घेतोस! माझा उपवास आहे आज !' म्हणायची हसत-हसत! मोठ्या आईचा राजाभाऊ पण खूप लाडका होता (त्याला ती गमतीनं aamche aajoba मानायची!)
दर दोन वाक्याला एक म्हण असायची तिच्या तोंडात ! (उदा. 'नाकपुडीत कीर्तन'! 😊 )
ती मला तिच्याबरोबर (सोबत म्हणून) पोथीला न्यायची विठ्ठल मंदिरात (कन्या शाळेच्या अलीकडे असलेला देऊळ) . तिच्या मैत्रिणी म्हणजे कोंडोंवकिलांची आई (Nannu ?) , कांबळे गल्लीतल्या दिंडोरेची आजी, हिराळकर (जी नेहमी काही तरी खबर, gossip
सांगायची म्हणून मोठ्या
आईने तिचं टोपण नाव 'टप्पा' पाडलं होतं! 😊
आष्ट्याचे बापू मामा (व बाबूमामा व त्यांच्या बहीण सुशीलाआजी कवठेकर) अधून-मधून घरी यायचे. काटीची शांतामावशी तिची बहुधा मावस बहीण होती. (मला लहानपणी नक्की नातं काय, असले प्रश्न कधीच पडले नव्हते! :-) तिची मुलं हि आठवतात मला . विलास , सुधीर व त्यांची एक बहीण घरी यायचे अधून-मधून. सुर्डीकर व अष्टपुत्रे हि नातलग होते.
अण्णांचा मोठ्या आईवर फार जीव होता. कोर्टातून घरी आले कि सर्वात प्रथम ते मोठ्या आईशी बोलायचे. कशी आहेस वगैरे चौकशी करायचे प्रेमानं.
लहानपणी मी थोडासा गोरा असल्याने ती मला 'कसा आहे माझा सोजीचा मुद्दा !' म्हणायची :-)
शनिवारच्या उपवासाच्या उसळीतला (साबुदाण्याची खिचडी - जिला आपल्याकडे तेंव्हा तरी उसळ म्हणत असत) एक तरी घास मला भरवल्याशिवाय तिला चैन पडायची नाही!
संध्याकाळची दिवे-लागण झाली कि ती बरीचशी स्तोत्रं
मला पुढ्यात घेऊन म्हणत बसायची. मारुती-स्तोत्र व 'सगुण रूप जय जय राम , निर्गुण रूप जय जय राम' (हे नक्की कोणतं स्तोत्र आहे?) वगैरे मला अंधुकसे आठवतात.
देव्हाऱ्यातल्या समई सारखी aani prasadatlya khadi-sakhresarkhi होती ती !..