दूर राहिली अलंकापुरी,
दूर राहिली चंद्रभागा
दूर ती नाम्याची पायरी
अन दूर गोजिरी विठु माऊली!
आठवे सदैव ती वारी,
घेऊन तुळसीमाता शिरी
मुखी सदा हरिनाम गोड
चटणी-भाकरही
वाटे गोड!
ना कधी पाऊले शिणली
ध्यास एकच माऊली, माऊली!
आठवे ते अश्व-रिंगण,
अन ते अवीट भजन कीर्तन
उरल्या आता फक्त आठवणी!
दाटून मळभही येते मनी
देवा काय झाला अपराध?
सांगा काय झाली आगळीक
वेड्या भक्ताची ही सेवा
रुजू करून घ्या हो सत्वरी
आक्रन्द मन वारी वारी!
-प्रशांत
No comments:
Post a Comment