ढग शुभ्र-धवल न्हाती सायंप्रकाशी
निमिषात रंग पीत-किरमिजी-तांबूस होती
अकस्मात मरुताची शीत लहर येई
अन रंग-बावरे मेघ कृष्ण-रूप होती
कुठे पावश्या वरुणाचे आगमन सांगी
कुठे हुंगत माती, खोंड उधळी माळरानी
ग्रीष्माचा दाह साहुनीया तप्त अवनी
पाहे वाट वरुणाची अधीर मनी होऊनी
न्याहाळी घन-माला गडद-गडद होती,
सौदामिनी चमके लखलख त्या अंबरा
..अन मग वर्षती जलद लक्ष अमृतधारा!
No comments:
Post a Comment