मागे
सोडी घर, काळजी अन
संसार
चालती
वारीत सोसूनी कष्ट अपार
कपाळी
टिळा अन मुखी सदैव
हरिनाम
ना
मनी मोह, ना जवळी
एक छदाम
विठुरायाची
अपार ती भक्ती
दीन-दुबळ्यांसी
देई ऐसी शक्ती
मैलामागोनि
चालती कैक मैल
भक्ती-रसात
मन डुंबलेले सचैल
करती
घोष ज्ञानेशाचा अन तुकारामाचा
भीमेकाठी
अनुपम मेळा ऐसा वैष्णवांचा
पोकळ
पोपटपंची करती अनेक साधू जरी,
पिक्या
म्हणे चरणी लीन व्हावे ऐशा वारकरी!
No comments:
Post a Comment