Total Page-Views

Sunday, September 6, 2026

अपनी भी पाठशाला..

शशिकांत(जाधव)ने शाळेत मला आधी बराच त्रास दिला पण नंतर मैत्री छान झाली होती! त्याचा आवाज चांगला होता! ‘शिर्डीवाले साईबाबाहे हिंदी गाणं त्याच्या पुढाकारामुळे आमच्या वर्गातील - जण सामूहिक म्हणायला जमायचो! नळदुर्ग रोडवर , गोलाईच्या जरा पुढे / पंचायत समितीचं कार्यालय / गोदामाजवळच्या मोकळ्या मैदानावर! (आता हे आठवून गंमत वाटते!)

 बंबईसे आया मेरा दोस्तया गाण्याची चालआता उजाडेलया मराठी कवितेवर लावण्याची कल्पना बहुधा त्याचीच होती! ती कविता तुम्हाला आठवत असेल (दोन ओळी तरी ) , तर म्हणून बघा! चालीत fit बसते! :-)

अशीच हिंदी चित्रपटातील गाण्याची चाल हिंदी कवितेला fit बसवली होती कै सदाशिवराव कुलकर्णी सरांनीसदाशिवराव धोंडोपंत  कुलकर्णी! (लहान गावात  राहण्याची एक  वेगळीच मजा असते. तुम्हाला मित्रांची (आणि शिक्षकांची पण) केवळ पूर्ण नावेच नाही तर त्यांचं आख्ख कुटुंब माहीत असतं) ...कडक इस्त्रीचा नेहरू  शर्ट, पांढरी  विजार, डोक्यावरचे केस  पूर्ण मागे वळवलेले, कपाळावर अष्टगंध, तोंडावर  एक  मिस्कील  हास्य  आणि  हातात  वेताची  छडी!  'Spare the rod and spoil the child' याला त्यांचं १००% समर्थन  असणार! (मार खाल्लाय  नां मी  त्यांचा एक-दोनदा तरी! :-) तुफान वेगानं चालायचे  ते (म्हणून  आमचा मित्र  शशिकांतने त्यांना 'बुलेट' हे  टोपण नाव  दिलं होतं! :-)) पाचवीत असताना आमच्या  इंग्रजी   हिंदी शिकण्याचा  श्रीगणेशा त्यांनीच केला होता.

..तर सांगत  होतो  ती  हिंदी  कविता; मातृभूमी तेरी , जय हो सदा विजय हो। तेरे प्रसन्न नभ में, सुखशांती सदा हो।’ 

आता हे खुप जुनं गाणं म्हणून बघा .. ‘ दिल मुझे बता दे, तू किसपे गया है..’ !! 

अर्थात ती कवितेची चाल या गाण्यावरून घेतलीय, हे मला परवा परवा कळलं! 😀

सदाशिवराव सरांनी आम्हाला वीत ‘Lazy Mary, will you get up’ ही कविता विद्यार्थ्यांकडुन मुलगी आई यांचा अभिनय करून घेत शिकवली होती! म्हणजे एकाला सांगितलं बाकावर झोप Mary असल्याचं सोंग घेत. (तेंव्हा बाकच होते , डेस्क आम्ही ७वीत असताना आलेदुसऱ्या मुलाला आई म्हणुन बाकाजवळ उभं केलेलं. संवाद/कविता सुरू

आई झालेला मुलगा: Lazy Mary, will you get up? Will you get up??

मेरी झालेला/बाकावर झोपलेला मुलगा: No, no mother; I won’t get up! I won’t get up!! 😀 

पण बघा , असं interactive / role-play करून त्यांनी अंदाजे १९७६ मधे शिकवलेलं आज पन्नास वर्षांनंतर २०२६ मध्येही जणू काल घडलंय असं आठवतंय!! 

 खरोखरच थोर शिक्षक लाभले होते आम्हाला! 🙏

 

आणि रम्य त्या आठवणी!! 


 शाळेचं नांव काय म्हणता


जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्रशाला..!!

(...अर्थात मराठी माध्यम! Convent किंवाइंग्रजी माध्यमअसे शब्दही तेंव्हा कधी कानावर पडले नव्हते हो!!) 

 

No comments:

Post a Comment