माझ्या teenage मध्ये जितेंद्र भलताच हिट नट
होता! पांढरी pant आणि कलरफुल टी-शर्ट असा त्याचा पेहराव अगदी ठरलेला
असायचा सर्व चित्रपटामध्ये! त्यातल्या टी-शर्टची मला भलती क्रेझ होती. Engineeringला प्रवेश
मिळाल्यावर माझी पहिली खरेदी कोणती असेल तर सोलापुरातल्या नवी पेठेतील बऱ्यापैकी
प्रसिद्ध कपड्याच्या दुकानातून तसला एक टी-शर्ट! नंतर माझं मलाच उमगलं की ‘तसले’
टी-शर्टस आपल्याला शोभून दिसत नाहीत! (कारण अस्मादिक काडी-पैलवान होते! J). मग वाटलं, हिवाळ्यात तरी ऋषी कपूर
सारखे मस्त रंगीबेरंगी स्वेटर घालावेत! (Sweat-shirt, turtle-neck वगैरे प्रचलीत
नव्हते. स्वेटरने ‘गुढीची काठी’ जरा गुबगुबीत दिसेल असाही सुज्ञ विचार होता! ;-))
मग एकदा धीर करून ‘तसल्या’ वुलनच्या
स्वेटरच्या किमतीची चौकशी केली आणि किंमत ऐकून त्या plan ला टाकोटाक तिलांजली
दिली!
Engineering नंतर पुण्यात नोकरी-निमित्त आगमन
झाले आणि नानाविध कपडे घेण्याची सुप्त इच्छा पुन्हा बाहेर डोकावली! मग काय; FC
रोड, JM रोड, camp पासून ते मुंबईच्या fashion-street पर्यंत बऱ्याच चकरा झाल्या!
मला वाटतं, १९९५-९६ च्या आसपास मदुरा कोट्सने
प्रथम branded शर्टस विकायला सुरु केले होते. Louis Phillipe ! मी नुकताच SAP
मध्ये आलो होतो. वाटलं, पहिला branded शर्ट घ्यावा. मला किंमतही अजून आठवते, ७०० ते
८०० च्या दरम्यान होता. माझा शर्ट पाहून माझ्या colleagues ना पण थोडा धक्का बसला होता! नंतर तो माझा
‘लकी’ शर्ट झाला. (प्रत्येकाचा असा एक शर्ट असतोच ना :-?). पुढे मी Singapore
ला आणि लगेच
अमेरिकेला गेलो आणि अगदी वेड्यासारखा प्रत्येक brandचा एक तरी शर्ट विकत घेणं सुरु
केलं!
आधीच माझं वापरणं अगदी काळजीपूर्वक, त्यातून शर्टची
quality उत्तम
आणि मी कित्येक दशकं त्याचं मापात (पक्षी, वजनात! J)! त्यामुळे बायकोच्या साड्यापेक्षा माझ्या शर्टची
गर्दी जबरी वाढली! (हो, ‘तो ‘ Louis Phillipe शर्ट अजूनही माझ्या ward-robe मध्ये आहे बरं का!)
असे असंख्य शर्टस, trousers कित्येक वर्षापासून (काही महिन्यांची सक्तीची विश्रांती
देऊन) घालतोय. मध्यमवर्गीय संस्कारामुळे मस्ती करून कपडे फेकवत/देववत नाहीत.
प्रत्येक कपड्यामागे काही तरी स्मृतीही दडलेल्या असतात ना!..
...आणि अचानक मनात विचार तरळून गेला. शरीररुपी वस्त्र
सोडून जाताना केवढ्या यातना होत असतील नाही???
No comments:
Post a Comment