पारा उडून गेलेल्या
बिलोरी दर्पणी ती
कैक दशकांपूर्वीची तारका
आठवतेय स्वतःला..
केसांच्या सदोदित ओढाळ बटा,
नितळ कांती, जीवघेणी
अदा,
मादक आवाज, दाहक
कटाक्ष
रसिक व्हायचे कायमचे फिदा!
.. ...
... .. .. .. ..
.. ..
.. .. .. .. .. .
आता सुरकुत्यांच्या उभ्या-आडव्या
रेघा,
पांढऱ्या केसांचं नकोसं ते जंजाळ,
कापरा जाडा-भरडा आवाज अन
भिंगांच्या डोळ्याखालची काळी
वर्तुळं!
..संतापाच्या
तिरीमिरीत होतात
सहस्त्र तुकडे त्या दर्पणाचे,
विखुरलेल्या तुकडयागणिक ती
शोधतेय तारुण्य, हरवलेलं,
...तारूण्य
हरवलेलं!!!
- प्रशांत
No comments:
Post a Comment