अगदी लहानगी होतीस तू,
वाढदिवशी satin च्या गुलाबी frock मध्ये
दिवसभर बागडत होतीस तू,
त्यादिवशी मी परी पाहिली होती!
...आठवतंय तुला?
यौवनाच्या तू उंबरठ्यावर असताना,
मुग्ध कळीचे टपोरे फुल होत असताना,
सरळ नासिका, अन भावदर्शी डोळे ते,
कित्येक कलिजे खल्लास झाले होते,
...आठवतंय तुला?
अवचित एकदा रस्त्यात भेटलो होतो,
पुढे गेलीस तू मंद हसून,...
मागे वळून पाहिलं, ..तू पण होतीस पाहत वळून,
ग्रीष्माच्या उन्हात शरदाचं चांदणं जणू!
...आठवतंय तुला?
अबोल प्रेमाच्या कैक आठवणी
उफाळून येती अजूनही मनी
संध्याछायेच्या उदास एकांती
जर-तरची कोडी सोडवी!
...आठवतंय तुला?
...आठवतंय तुला??
No comments:
Post a Comment