Total Page-Views

Monday, April 18, 2016

पांढऱ्या भाकरीतला चंद्र


चाळीस एक वर्षं लोटली असतील,
त्या भीषण दुष्काळाला ,
पण काही जखमा असतात अश्वत्थाम्यासारख्या,
असेन मी तेंव्हा पाच-सहा वर्षांचा,
लुकडा,भाबडा, भित्रा, बुजरा
चार वाजता tanker गल्लीत यायचा ,
अन पाच-पैशांनी घागर भरताना
हमरी -तुमरीवर यायचे शेजारी-पाजारी,
हापश्याच पाणी आणायचे मोठे भाऊ ,
पण हाताचे घट्टे नाही कधी दाखवायचे !
वडिलांच्या धीरगंभीर दिसण्याचा अर्थ
उमजायचं माझं वय नव्हतंच ते,
मी आपला कधी भाबडेपणानं,
कधी अनामिक भितीनं, बसायचो गप्प-गप्प
जखमेवरचा पापुद्रा फाटत आठवतंय ,
मिलोच्या तांबड्या भाकरीचे तुकडे गिळताना
आईकडे केलेला 'पांढऱ्या भाकरीचा' बाल-हट्ट !
अन मग ,आईचा कसनुसा चेहरा!!



-प्रशांत



No comments:

Post a Comment