लहानपणी मार्कांसाठी घासायचं,
मोठेपणी career साठी घासायचं,
आदर्श पुत्र, पती, पिता होण्यासाठी
आयुष्यभर धडपडायचं..
भविष्याची बेगमी करण्यासाठी,
वर्तमानात जगणं सोडून द्यायचं
माफकशा स्वप्नासाठी, माफकसं धावायचं,
काही सजीव, आणि बऱ्याच निर्जीव गोष्टीमध्ये,
जीव मात्र अकारण गुंतवायचा!
अन एक दिवस शेवटचा श्वास घेत,
'so-called'
अनंतात विलीन व्हायचं!
२०६ हाडांच्या २-३ किलो राखेच्या पोत्यात
कोणत्या तरी नदीत मिसळून जायचं!
चंदनहार-जडीत फोटोरुपी भिंतीवर उरायचं,
(एक-दोघांच्या ह्रिदयात काही वर्षं स्मृतीरुपी राहायचं!)
.. .. ..
... ... .. ..............................................
.. .. ..
.. .....................................................
...... ............ ..........
................... .............
श्री राम!!!
-- प्रशांत
No comments:
Post a Comment