होतास वानर, झालास नर, पण
यत्न ठेव कायम, होण्यास
नारायण |
सोड साधू, फकीर, बुवा ,
उपदेश ऐक नेक
जोड मनोभावे देवा, हात दोन,
मस्तक एक |
पालक, शिक्षक, सहचारिणी,
त्वा यशाचे शिल्पकार
गगनी उंच विहरताना, नको रे
फुकाचा अहंकार |
प्रयोजन काय जीवनाचे अन
अर्थ काय अस्तित्वाचा,
प्रश्न हे केवळ मिथ्या,
आनंद घे तू वर्तमानाचा |
‘पीक्या’ म्हणे आता, घ्यावा
तिळगूळ, बोला गोड
धर्म-जात भेद, मत्सर, गर्व
मात्र सत्वर रे सोड |
-प्रशांत
No comments:
Post a Comment