परवा गीतरामायणमधील एक गाणं ऐकत होतो आणि अचानक strike झालं की, राम-लक्ष्मण , ज्यांच्या अजोड बंधुभावाची गोडवी सारा हिंदुस्थान गातो , आजही आदर्श म्हणुन पाहतो ते दोघं सख्खे भाऊ नव्हे तर सावत्र भाऊ होते! तिकडे महाभारतात धर्म-भीम-अर्जुन हे तिघं नकुल-सहदेव द्वयीचे सावत्र भाऊ होते!!पण रामायणात असो वा महाभारतात , कुठेही त्या भावांच्या नात्यात सावत्र म्हणुन किंचितही खोट नव्हती!!
मग वाटतं, या पार्श्वभुमीवर भावा-भावातील (ते पण सख्ख्या) भांडणं (ज्याला आपण भावकी म्हणतो अथवा भाऊबंदकी) कधीपासून सुरू झाली असेल? इतिहासात याची पहिली नोंद केंव्हा झाली असेल? (आणि मी हिंदू भावांची भांडणं म्हणतोय. मोघल राज्यकर्त्यातील भावकी व सत्तेसाठी ते भावांना, जन्मदात्याला ठार मारुन सिंहासन बळकावत , हे तर सर्वश्रुत आहेच!)
आजच्या काळात तर वडिलोपार्जित इस्टेट एक मोठं राज्य असो , मोठी कंपनी असो वा अगदी एक गुंठा जमीन; सख्ख्या भावांत वितुष्ट , आज ना उद्या , येत असतंच.. (वाटण्या झालेल्या असल्या तरी) कडाक्याचं भांडण होत नसेल अथवा कोर्ट-कचेरी पर्यंत जात नसेल पण अबोल्याचं शीतयुद्ध असतंच बहुधा घरोघरी!! ..आणि त्याच वेळेस चुलत/मावस/मामेभावंडाबद्दलचा प्रकर्षानं दाखविला जाणारा उमाळा..!!)
मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क (भावांबरोबर) मिळण्याचा कायदा झाला आणि घरोघरी एका नव्या भांडणाला तोंड फुटलं! यावर जास्त काही न बोलता एवढंच म्हणेन की आता ब-याच बायकांची माहेरं दुरावली, …पोरांची आजोळं दुरावली!!
नात्यांचे स्नेहरज्जू नाहीसे होतायत.. माणसं एकाकी बनत चाललीयत!! Technology मुळे सारं जग जवळ आलं असलं तरी ‘water, water everywhere but not a drop to drink’ अशी समुद्रात अडकलेल्या माणसासारखी स्थिती झालीय!!
-प्रशांत
No comments:
Post a Comment