आताशा आकाशातील रंगोत्सव
मनाला
तशी भुरळ घालत नाही
चुकार
डोळे कुठे तरी ढगांची
काळपट
किनारच शोधत असतात..
गच्च
हिरवाईचं जंगल तुडवताना
वानप्रस्थाश्रम
आठवुन जातो उगाचच..
मग
भकास डोळ्यांनी पाहत जातो
उमलत्या
फुलांवरील चंचल फुलपाखरं
क्षणभंगुरतेची
पाल मात्र चुकचुकत असते..
गोधुलीनं
थरथरती सांज काळवंडताना
पक्षी
घराकडे थव्याने उडत जाताना..
मला
रिकामं घरटं आठवत चर्र
होत जातं!
-प्रशांत
No comments:
Post a Comment