आजकाल फेसबुक आणि WhatsApp म्हणजे तत्त्वज्ञानाची खाण झाले आहेत. रोज मौलिक रत्ने मिळत असतात सकाळ-सकाळी
फुकटात!
परवाच हे वाचण्यात आलं, “ जीवन में एक दोस्त कर्ण जैसा भी
जरूर होना चाहिये, जो तुम्हारे गलत होते हुये भी तुम्हारे लिये युद्ध करे!” ...
भारी आहे ना? ...एकदम सुपर-लाईक, right :-?
पण वास्तव काय आहे पाहताय का एकविसाव्या शतकातलं? मित्र चूक
असूनही (किंवा अगदी बरोबर असूनही!) त्याला साथ देणं तर फार लांबची गोष्ट आहे हो; पण
त्याला कधी भेटायलाही (त्याच शहरात असूनही) कोणाला वेळ नाहीये! आणि हो, काम असेल तर लोक भेटतात / फोन करतातच. पण
काहीही काम नसताना किती वेळा आपण मित्राला “ अरे बऱ्याच दिवसात भेटलो नाही, म्हणून
फोन केला भेटण्यासाठी” असं म्हटलं आहे? किंवा ,” अरे काही काम नव्हतं, बऱ्याच
दिवसात भेटलो/बोललो नाही म्हणून फोन केला. कसा आहेस मित्रा ?“... असं निखळ
मैत्रीला जागून म्हटलं आहे?
झालंय काय की बायको,मुलं, घर आणि नोकरी या छोट्याशा कोषात
सर्वच कमालीचे गुंतले आहेत. (..असं दाखवतात तरी वरकरणी!) वरती fast life, traffic-jams, ‘वेळच नाही’,
अशा सबबी आहेतच! हो, पण या छोट्या विश्वात आणि ‘so-called’ धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात जागा मिळते ती मात्र
सासू-सासरे आणि मेहुणा-मेहुणीनांच ! J (...Like-Like करु ना मित्राच्या post ला
बसल्या-बसल्या!!J)
...खरं आहे नां ? J J
No comments:
Post a Comment