प्रधान - राजेसाहेबांचा इजय असो !
राजा - अरे,नीट विजय तरी म्हणत जा !
प्रधान - त्यो आमचा accent हाये , राजे! आणि आता या वयात आमी काय नवं शिकनार ? ‘सत्तरी ओलांडल्याशिवाय’ आपल्याकडं परधान होता येत नाही. आता आपल्या युवराजांचीगोष्ट येगळी म्हना!
राजा - बरं , बरं. जास्त शहाणपणा नको शिकवू आम्हास! राज्य काय म्हणतय आपलं ?
प्रधान - छान झोकात चाललय की ! दोन-चार बॉम्ब -स्फोट , आठ -दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अन दहा-वीस स्त्री-अत्याचार सोडले तर 'आल ईज वेल ' बगा! बरं , तुमी सांगा, तुमचा अमेरिका दौरा कसा झाला?
राजा - अरे काही विचारू नकोस बघ. काय देश आहे... नुसता अळणी ! दंगेधोपे नाही, अपघात नाहीत, संप-हरताळ नाहीत, काय बातमीच नाही राव अमेरीकेत! हे म्हणजे 'वरण-भात' जेवण्या सारखं ! स्कॅम ची झणझणीत कोंबडी तर लांबच !हिलरीबाई भेटल्या ;त्यांचं सांत्वन केलं.
प्रधान - अन ते कशापायी राजे?
राजा- अरे, त्या मंत्रीपदावरून retire झाल्यात नां. क्लिंटन भाऊ पण घरीच असतात ना सात-आठ वर्षांपासून . त्यामुळे घर-खर्चाच्या विवंचनेत आहेत बिचाऱ्या . १८० हजार डॉलर वार्षिक पगारात त्यांनी काय बर सेविंग केलं असेल!
प्रधान- फकस्त १८० हजार डॉलर वार्षिक पगार? अवो , त्याच्याहून जास्त तर आपला नगरशेवक बी ‘वरकड’ कमावत असल सहा महिन्यात ! अमेरिकेला आपल्या लोकशाहिकडून शिकायला बक्कळ वाव आहे राजे! तुमी हिलरीबाईना भारत भेटीचं आवतन द्याच. त्यांना जयपुर,जोधपुर , गोवा , मैसूर ची ट्रीप घडवून आणू अन ‘साडी-चोळी –बांगडी’ भाऊबीज ओवाळणी म्हणुन १०१ कोट रुपयांचं शासकीय अनुदान देऊ टाकू ! कसा वाटतोय पिल्यान ?
राजा - झकास! संपन्न भारताच्या image ला साजेसा अगदी ! फोन लाऊन दे लगेच !

-
प्रशांत (२४/०२/१३)
No comments:
Post a Comment