गीत-महाभारत (१)
पाहसी वंदनीय पितामह भीष्म समरांगणी
अतुल्य गुरु-द्वयी कृपाचार्य-द्रोण हि रणी
रथी मातुल शल्य, शकुनी, तयांस वंदू
दुर्योधन, दु:शासन आणि कैक मम बंधू
कोवळा लक्ष्मण पुत्रागणिक तो मज
अन अश्वत्थामा तो बंधूगणिक मज
सर्व माझे आप्त, सर्व माझे स्वकीय जरी
कैसे मी शर- संधान करावे तयांवरी
मारण्या तयांना का मी रोखू तीर त्यांच्यावरी
वधून तयांना का मी घ्यावे घोर पाप हे
शिरी
मारून तयांना नको मज ते राज्यसुख
कुलसंहार करूनी दाखवू कोणास मुख
गात्रे गलीत, कोरडे पडे मुख अन वाराही
स्तब्ध
काय योजिले योगेश्वरा, कैसे हे अगम्य प्रारब्ध,
सांग कृष्णा, किम कारणेन करावे मी हे युद्ध?
सांग कृष्णा, किम कारणेन करावे मी हे युद्ध??
-प्रशांत
No comments:
Post a Comment