पाहून मज तू आनंदी,
तव गाली फुलती गं गुलाब,
विसरून सारी रूढी-बंधनं,
नेत्रांत दिसे मज तीच शराब
.. यालाच का गं म्हणती प्रेम?
कधी पाहून तुज केविलवाणी,
नयनी माझ्या येते पाणी,
तोडावीशी वाटतात सारी बंधनं,
राणी तुझ्याच साठी, तत्क्षणी,
.. यालाच का गं म्हणती प्रेम?
उद्यानी या बहरती गुलाब, झिनिया, डेलिया,
परी प्यार मला हे बकुळीचं फुल,
डोळा भरून तुज पाहे कोणी,
..अंतरी माझ्या उमटे शूल,
.. यालाच का गं म्हणती प्रेम?
... यालाच का गं म्हणती प्रेम?
-प्रशांत
No comments:
Post a Comment