उन्मुक्त अवखळ बालकासारखा,
तो थुई-थुई नाचतोय,
विजेशी लपंडाव खेळत
अलगद धरेवर अवतरतोय
तृषार्त चातकाला संजीवनी देत
दीठ लाऊन बसलेल्या बळीराजाच्या मनी
आशेचे नवे धुमारे फुलवत
तप्त धरणीस न्हाऊ घालतोय
कधी कमल-दली झेपावणाऱ्या
खट्याळ भ्रमरासारखा, तर कधी
आसुसलेल्या देवदत्तासारखा
वसुंधरेस आवेगे चुंबतोय
कुठे रात्रीच्या घन-तिमिरी
एकलंपण अनावर होऊन
तप्त गाली विसावणाऱ्या
मूक हुंदक्यासारखा
पाऊस कोसळतोय,
पाऊस कोसळतोय!
-
प्रशांत
No comments:
Post a Comment