माझं आणि उर्दूचं फारसं
सख्य नाही. पण मला एक शेर चांगलाच आठवतो (जो बहुधा माझ्या
आयुष्यातला मी ऐकलेला पहिलाच शेर असेल, तेंव्हा असेन मी १५-१६ वर्षांचा):
“अश्क आँखों में आये, तो होठो से पीले,
दिल जो रोये, तो होठोंको सी ले !”
हा आणखी एक कोठे तरी
वाचलेला..
“फानूस बनके जिसकी हिफाजत
हवा करे,
वो शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे!”
असाच दूसरा एक शेर माझ्या मनात चांगलाच घर करून आहे..
“सारी उम्र भर ग़ालिब यही
भूल करता रहा,
धूल चेहरेपर थी, और आइना साफ़ करता रहा !”
जवळपास याच संदर्भातील एक
वाक्य आठवतं (बहुधा साने गुरुजीं किंवा तुकांराम महाराजाचं असेल), “नाही निर्मळ जीवन, काय करील साबण?” मला आंतरबाह्य शुचितेचं
एक वेगळंच आकर्षण आहे! कारची धुळीने माखलेली
पुढची काच (windshield) वायपरने एक-दोन सेकंदात स्वच्छ
करताना मला खुपदा वाटून गेलंय, ‘ असंच काही तरी mechanism असावं की जे वापरून माणसाचं गढूळ मन कसं आरशासारखं लख्ख करता आलं पाहिजे!’ .. आणि थोडा विचार केला तर असा
एक उपाय सापडला मन स्वच्छ करण्याचा!... पश्चाताप-दग्ध अश्रू! ..Catharsis!! आणि बहुधा त्या मुळेच ख्रिश्चन धर्मात confession ला एवढं महत्व असावं!
चला, या रविवारी सकाळी येथेच
थांबतो...
-
प्रशांत (१४/०९/१४))
No comments:
Post a Comment