Total Page-Views

Tuesday, October 25, 2016

श्रावण (दशपदी)


मेघांची किनखाप निळी-जांभळी-काळी

उभा ध्यानस्थ कसा धवल बक तो जळी

कुठे शीतल वाऱ्याने शहारे मुग्ध कळी

गोकुळचा अवखळ गोऱ्हा हुंदडे तरुतळी

अन तिकडे मयुराची नृत्य-मुद्रा ती आगळी

श्यामल वसुधेची हिरवीकंच  चोळी,

केशरी उन्ह-पावसात होई थोडी ओली

गाली गुलबक्षी-किरमिजी ढगांची लाली

अन कधी सप्तरंगी इंद्रधनू हार नवा ल्याली!

..बेटातून वेळूच्या, सावळ्याची शीळ मग आली!!-
प्रशांतNo comments:

Post a Comment