Total Page-Views

Monday, September 2, 2019

जीवजंतू


जन्मल्यापासून माता-पित्यांच्या आकांक्षांचं गाठोडं सावरत
त्यानं पदवीचा उंबरठा कसा-बसा पार केला
cut-throat competition मध्ये बाजी मारून त्यानं क्लार्की चालू केली,
तेंव्हा सरकी मिळाल्याच्या वरताण आंनंद झाला त्या माता-पित्यांना!
थोडे टेबलावरचे, थोडे टेबलाखालचे स्वीकारत त्यानं
प्रथमपुत्रप्राप्ती समयीच ‘श्रम-साफल्य’ बांधलं,
तेंव्हा त्याच्या बेचाळीस पिढ्या धन्य झाल्या!
पुढे ‘सई’, हुसेन, प्रिस्ले, Madonna अशी नावं,
जिव्हेवर खेळवत तो cheers म्हणत चषक उंचावू लागला,
तेंव्हा त्याची white-collar आणखीनच ताठ झाली!
Convent-culture मधून आन्ग्लाळलेली त्याची मुलं
mom, pops म्हणत तारे तोडू लागली
आणि काऊ-चिऊची गोष्ट सांगणाऱ्या आजीची
त्या चकचकीत बंगल्यात पंचायत होऊ लागली
क्लब मीटींग्ज, चारशे टीवी channels व X-Box च्या गदारोळात
माता-पित्यांचा पांडुरंगनामघोष गुदमरू लागला
High blood-pressure व डायबीटीस या life-style रोगांच्या
अधीन जाऊन तो रिटायर होण्याआधी कैलासवासी झाला
फेसबुकमध्ये त्याच्या फोटोला तीनशेदोन RIP comments आल्या,
आणि मग त्याच्या आत्म्याला शांती मिळाली!

No comments:

Post a Comment