Total Page-Views

Monday, September 2, 2019

माणसं


लुसलुसत्या नवागत कोंबासारखी,
लवलवत्या लव्हाळयासारखी,
लपेटत्या द्राक्ष-वेलीसारखी,
डौलात उभ्या ज्वारीसारखी,
मत्त वेड्या केवड्यासारखी,
लह्लह्त्या गुलमोहरासारखी,
शोभिवंत बोगनवेलीसारखी,
अर्धोन्मीलित लाजाळुसारखी,
प्रसन्न पारिजातकासारखी,
दरवळत्या मोगऱ्यासारखी,
दुखऱ्या काटेरी गुलाबासारखी,
गाभूळलेल्या चिंचेसारखी,
उघड्या-बोडक्या बाभळीसारखी,
वेड्या-वाकड्या करवंदासारखी,
परजीवी बांडगुळासारखी,
डेरेदार आम्र-वृक्षासारखी,
गगनाला भिडू पाहणाऱ्या माडासारखी,
जमिनीत पुन्हा मूळ रुजवणाऱ्या वटवृक्षासारखी,
शिशिरात ओकंबोकंहोऊन वसंतात पुन्हा तजेलणाऱ्या मेपलसारखी,
......माणसं!!!




-प्रशांत


No comments:

Post a Comment