Total Page-Views

Tuesday, September 3, 2019

लोकशाही-लोकशाही खेळायचं का ?


सोनी - पिंटू, राजू , ढगळ्या, भातुकली खेळायची का ?
पिंटू - सोने, नको ती भातुकली! बोर झालं तेच-तेच खेळून ! आयडिया, आज आपण लोकशाही-लोकशाही खेळायचं का ?
सोनु - लोकशाई म्हणजे काय रे दादा ? लोकांना शाई लावायची का रे मतदानासाठी? जम्मतग नै !
सोनी - तू म्हणजे अगदीच लिंबू-टिंबू आहेस बघ अजून ! पिंटू , ग्रेट आयडिया! पण मी होणार हं
madam ! आधी मी आईकडून लांब बाह्याचा ब्लाउज आणते कशी !
ढगळ्या - अगं तू बाई आहेसच. नवीन काय त्यात?
पिंटू - अरे तिला high-command व्हायचंय ! म्हणजे ती सांगेल ते आपण सर्वांनी ऐकायचं !
ढगळ्या - पण ते तर आपण रोजच करतो की !
सोनी - अय्या आणि हे रे काय मोटू? तू असा पोळ्याच्या बैलासारख्या माळा का घातल्यास ? केवढी जाडजाड lockets आहेत रे बाबा !
मोटू- अगं मी तनसे नगरसेवकाचा रोल करणार आहे ! आणि  हा सोनू होईल "सोनू-शेठ", युवा-पुढारी!
सोनु - मोटू-भाई, तुम आगे बढो ! हम तुम्हारा homework सम्भाल्ते हैं !
राजू - ते सगळं खरं , पण लोकशाही-लोकशाही म्हणजे स्कॅम-स्कॅम पण खेळणं आलं! ते आपल्याला कसं जमणार बुवा ?
नरू - अरे सोप्पै राजू ! सुरेशने मागच्या वर्षी जोशीकाकुकडून २१ रुपये गणपतीची वर्गणी म्हणून घेतले आणि आपल्याला दिले! १६ रुपयांची chocolates एकट्यानं खाल्ली! तो तुरुंगातून निवडणुक लढवतोय असं खेळू या!
राजू - झकास ! आणि हा मोनू आपला तनमोहन ! तसाही हा नेहमीच सोनीचं सगळं ऐकत असतो! आणि शिऱ्या , तू तोंड का असं वाकडं करून बसलायस अचानक ?
शिरीष  - अरे मी हेमंत अवारांचा रोल करणार आहे. थोडी practice करतोय भूमिकेत शिरायची!
राजू - भूमिकेत शिरणं तुला काय लवाश्यत पिकनिकला जाण्यासारखं सोपं वाटलं का रे तुला? आमिर-अंकलचे धडे घेतले पाहिजेत बाबा! त्यांनी ऑस्कर केवढं मनावर घेतलंय बघ!
राम - आम्हाला पण घ्या नं खेळात! नाही तर मी रडीचा डाव खेळणार हं, एकदाच बोलतो मी!
राजू - तुझं आडनाव विसरलेअसलं तरी आम्ही तुला कसं विसरू? पण तू कधी ढगळ्याबरोबर दोस्ती करतोस तर कधी माझ्याबरोबर! तुझा नक्की मित्र कोण आहे रे?
राम- अरे त्या दिवशी तो पार्टी देणार होता, म्हणून त्याच्यासंगे फिरत होतो. तू रागाऊ नकोस रे!
आदित्य - अणि आम्हाला कोणती रोल मिळणारै ?
राजू- अरे तुम्ही convent चे! तुला कसं शुद्ध मराठी बोलता येईल?
आदित्य - ते काही नै! मला रोल नै तर मी bat आणनार नै ! काकाकडून मी खळ-खट्ट्यक learn केलै.  Telling you हं!
सोनी - बरं , बरं, रागाऊ नकोस रे सदानकदा! तो सुजित बघ केवढं घाबरून पाहतोय !  उगी, उगी!
चिदु - मी माझ्याकडची एक dollar ची नोट आणू खेळायला?  sam-uncle नी मला दिली होती मागच्या India-trip मध्ये present म्हणून !
पिंटू - चिदु , मला दे ना रे ती dollar ची नोट! मी तुला त्याबदल्यात शंभर रुपै देईन बाबांना सांगून.
चिदु - छट, मी काही अलीबागसे आया नही!  सहा महिने थांबतो, दोनशे रुपै देशील तू मला एका dollar च्या बदल्यात तेंव्हा !
सोनी - हो रे ! गप्प बसा पाहू जरा शहाण्या मुलांसारखे! मला जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय. तरी बरं, ती दंगेखोर सुषी अजून आली नाही खेळायला आपल्यात!
राजू - पण आपण गप्पाच मारत राहिलो अन लोकशाही-लोकशाही खेळायचं राहून गेलं !
सोनी - आयडिया! आपण  हेच सगळं लिहून काढूया आणि आपल्या colony च्या गणपती-बाप्पांसमोर याचं एक नाटुकलं बसवूया .
मोनू - ग्रेट आयडिया सोनीताई! चला रे चिदु, शिऱ्या, लागू कामाला! …”हो रहा है नाट्य-निर्माण! 



(Written in year 2013)


No comments:

Post a Comment