सार आकाश कुंद-कुंद झालंय,
सारा आसमंत अंधारानं व्यापून गेलाय
जणू काही पृथ्वीवरचा सारा प्रकाशच लुप्त झालाय!
सागराच्या पर्वतप्राय लाटा उसळतायात,
घोंघावणार वादळ जीव गुदमरून टाकतंय
अन मला पैलतीर गाठायचाय!
तुझ्या स्मृतींनी माझ्या मनीची सतार झंकारून निघाली,
अन मला त्या उन्मत्त सागरातही दीपस्तंभ दिसला
पौर्णीमेच पिठूर चांदण तुझ्यातून लख्ख हसतंय
निळ्या नभी सानुली चंद्रकोर विराजलीय
घनदाट तिमिर तर कधीच पळालाय,
अन मग पैलतीर कधी गाठला कळलंच नाही!
No comments:
Post a Comment