चिंगे, अगं ‘मोदीकाका कोठे आहेत’, ‘मोदीकाका कोठे आहेत’, अशी
भुणभुण का माझ्या मागे लावतेस?
ते नाही का गेले विश्व-प्रदक्षिणेला? त्यांनी पृथ्वीभोवती
सात फेरे मारण्याचा संकल्प सोडला होता, आताशी पहिली पूर्ण होतेय. आहेत अजून चार
वर्ष बाकीच्या पूर्ण करायला! आणि अगं परराष्ट्रमंत्री भारताबाहेर पडल्याच नाहीत,
असं काय म्हणतेस? त्यांना पाहून मला माझी सात्विक चेहऱ्याची काकू आठवते बघ! तशाच
मानवतावादी! केवढी मदत केली त्यांनी भारतात बसल्या-बसल्या दुसऱ्या मोदीला! आणि राजस्थानचा
रिमोट लंडनला आहे असं काही तू ऐकलं असशील तर ते साफ चुकीचं आहे हो पोरी ! आपल्या
नमोकाकांना केवढा राग येईल? आणि शहाकाका परवा अगदी बरोबरच बोलले. जाहीरनाम्यात
त्यांनी चांगलं २५ वर्षं लिहिली होती ‘अच्छे दिन’ आणायला! त्या प्रिंटवाल्यांनी २
चुकून लहान font मधे छापलं, हि काय त्यांची चूक आहे का, सांग बरे? चहाटळपणे पुन्हा-पुन्हा
त्या व्यापम की भ्रष्टमचा उल्लेख करु नकोस बरे, सांगून ठेवतो एकदाच चिंगे! अगं आपले
आबा सांगूनच गेलेत ना, बडे बडे देशोमे छोटी-छोटी बाते होती रहती है! झालं तर मग! आणि
त्या भुजबळांचं काय झालं विचारतेस? शरदकाकांनी भृकुटी वक्र केली आणि देवेन्द्राची
पाचावर धारण बसली ना गं ! पुराणकाळापासून तसच चालत आलंय ना गं चिंगे! आता अशी
फुरंगटू नकोस. पंकजा-मावशीची चिक्की खायची ना बाळीला माझ्या! चल तर मग..
(Written in 2015)
No comments:
Post a Comment