आपल्या मुख्यमंत्र्यांचं वाखाणणीय अभियान काल
वाचण्यात आलं. दोन कोटी झाडं एका दिवसात महाराष्ट्रभर लावण्यात आली! त्यासाठी
शासकीय यंत्रणा सुत्रबद्धरीत्या राबविण्यात आली. खड्डे खणून घेतले होते; शासकीय
अधिकारी झाडाचं रोपटं लावत होती. (फेसबुकवर पाहिलं हो!) ते पाहून माझं मन मात्र
भूतकाळात गेलं!..१९७९-८० बहुधा!!
मी जिल्हा परिषद शाळा, तुळजापूरमध्ये सातवी-आठवी
मध्ये शिकत होतो. वृक्षारोपणाचं महत्त्व आमच्या क.भ. प्रयाग सरांनी अस्खलित
मराठीमध्ये एक तास बोलून सांगितलं. आम्ही पोरांनी सवयीप्रमाणे भरपूर टाळ्या
पिटल्या. मग बोलायला उठले N.C.C. चे
शेळके सर! आर्मीत कमांडर वगैरे म्हणून शोभतील अशी त्यांची personality होती. सर्वच मुलं (आणि मी तर फारच!) त्यांना
घाबरून होतो. त्यांनी त्यांच्या करड्या शब्दामध्ये action
plan सांगितला, अगदी मुलांनी खड्डे किती बाय किती
खणायचे इथपर्यंत. सर्व मुलांना जागा (खड्डे कोथे खणायचे) allocate
केल्या, deadline सांगितली
आणि आम्ही मुलं जवानांसारखे सुटलोच mission वरती!
झालं, मी आपला कुदळ घेऊन भिडलो खड्डा खणायला! मला
कुठे सवय (किंवा तेवढी शक्ती) खड्डा खणायला! थोडं खणलं तर एक जबरी मोठा दगड काही
निघेना. मी घामाघूम. मग एका मित्राची मदत घेतली. पुन्हा चालू खड्डा खणण! अगदी टेप लावून
मी मोजत होतो खड्ड्याची लांबी, रुंदी, उंची! (मी बिचारा एवढा भाबडा होतो की मला
खरच वाटलेलं की सर परत खड्डा check करायला
येणार! J)
एकदाचा खड्डा झाला, मी काही तरी भारी achieve केल्याच्या
भावनेनं रोप लावलं, पाणी घातलं! आणि मग चालू झालं त्या झाडाला रोज पाणी घालणं,
प्रेमानं बघणं! एक-दोन महिने केलं हे मी. नंतर बहुधा परीक्षा आली, सुट्ट्या
लागल्या आणि मी विसरून गेलो. शाळा सुरु झाल्यानंतर येऊन पाहतो तर काय, रोप बहुधा
शेळीने खाल्लं असावं! मला फार वाईट वाटलं होतं!
पण ही झाडं / फुलझाडं लावायची आवड मी घरीही
जोपासत होतो. आमच्या परसामध्ये माझे नाना प्रयोग चालायचे. कधी गाजर लाऊन बघ, कधी
कांदा, बटाटा, कधी कोथिंबीर, पानफुटी तर कधी गुलबक्षी! गुलाब आणि मोगरा होतेच.
अंकुर फुटताना, कोवळी पानं पाहताना फार आवडायचं मला!
पुढे पुण्यात आलो, लग्न झालं, घर घेतलं आणि
बागकामाची आवड परत उफाळून आली! घराच्या compound-wall नजीकची
आणि घरातील बाग मोठ्या कष्टानी मी व बायकोने केली, जोपासाली. मी सौंदर्यवादी तर
बायको उपयुक्ततावादी! त्यामुळे बागेत सुंदर दिसणारी फुलझाडं आणि केळी, पपई, डाळिंब
अशी बरीच झाडं लावण्यात आली. दरवर्षी बरोबर मे महिन्यात फुलणारं Mayflower, प्रसन्न शेंदरी रंगांची फुलं देणांरा exora, pentas, जुलै-August मध्ये रात्री फुलणारं अनोखं ब्रह्मकमळ, रातराणी,
गुलाब, मोगरा आणि बरेच काही! मागच्या दोन-तीन वर्षापासून पाऊसाने ओढ दिली. पण
बायकोने drip-irrigation plan करून
प्रेमाने झाडं, बाग जगवली.ती हिरवाई,रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं आणि नानाविध पक्षी
पाहिले की सगळा थकवा, शीण जातो. मन प्रसन्न होतं, टवटवीत होतं..
(...आणि मग कविता होते! J)
No comments:
Post a Comment