Total Page-Views

Monday, September 2, 2019

माझ्या नावाची ‘ष्टोरी’


पिंपळेकर-कुलकर्णी नावावरून बऱ्याचं पृच्छा आल्या, मागेही काही मासलेवाईक comments आले, तेंव्हा वाटलं आता सांगावीच ‘ष्टोरी’, माझ्या नावाची!

वाढली नां उत्सुकता  :-?

काही नाही हो, आम्ही मुळचे पिंपळा (बुद्रुक) या गावचे. तुळजापूर तालुक्यात आहे एक छोटं खेडं! हो, तिथे आमची थोडीशी शेत-जमीन आहे अजूनही (कोरडभू हो!). गावाचे कुलकर्णी & पिंपळा गावचे रहिवासी म्हणून पिंपळेकर , अशा दोन्ही नावानी आमचे पूर्वज आणि वडील ओळखले जायचे. सर्व भावांचं official (i.e. on records) आडनावही कुलकर्णी आहे. माझं पण सात-बारा वर आडनाव कुलकर्णी! पण शाळा-प्रवेशावेळी मात्र माझं नाव पिंपळेकर लावलं गेलं. नक्की कारण मला माहित नाही. (बहुधा ब्राह्मण-द्वेष त्या काळात असल्याने तसं केलं गेलं असेलही). पण एकदा एक आडनाव चिकटलं की ते बदलणं अवघड असतं (मुलांना तरी). सर्व भावांचं आडनाव कुलकर्णी आणि आपलं मात्र पिंपळेकर, हे बरोबर नाही असं वाटून मी काही दिवस officially नाव बदलण्याचा विचार करत होतो. पण तोपर्यंत पिंपळेकर नाव त्रिखंडात पोहोचलं होतं! (म्हणजे, Thanks to my disgruntled SAP customers spread all over the world J) फेसबुकवरती म्हटलं चला, आपलं कुलकर्णीपण फार काही कष्ट न करता सांगता येईल, सगळया नातलगाना पण easily relate होता येईल, अशा भावनेनं मी माझा ‘नाम-विस्तार’ केला फेसबुकवर! आणि तसं हि आमच्या मराठवाड्यात दुहेरी आडनावं नावं लावायची सवय आहेचं की! शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख बाभळगावकर, शिवराज पाटील चाकूरकर, साहेबराव पाटील डोणगावकर.. किती उदाहरणं सांगू? पण माझ्या पुण्या-मुम्बईच्या  (काही) मित्राना याचा पत्ताच नसल्याने बिचारे उगीचच हैराण होते माझ्या नावावरून! इतके कि, FB वर माझा एखादा लेख वाचून त्या विषयी काही तरी बरी-वाईट comment करण्याऐवजी, “...ते लेख वगैरे time pass ठीक आहे रे प्रशांत, पण तुझ्या आडनावाचं काय?’ J J  असो!

No comments:

Post a Comment