अहो, ठाऊक आहे काय?
जगद्नियंता आहे मद्यपी!
या मद्यपानाच्या झिन्गेत त्यानं काय नाही केलंय?
त्यानं निर्मिलेल्या प्रत्येक मूर्तीतआहेत दोष
जशी असतात defective castings!
कोणाला केलंय नवकोट नारायण
तर कोणाला मृत्त्यू-शय्येवरही असते चिंता
‘कोण पुरवील सरण’?
दारिद्द्र्याचं वस्त्र सावरत पतिव्रता
भक्तीभावे वड पुजत असते
अन कोठे ‘page three’ lady
रोज नवी शय्या सजवत असते
सत्तेसाठी पित्यास जीवे मारणाऱ्या औरंगजेबास यांनाच निर्मिलंय,
पित्राज्ञेसाठी वनवास भोगणाऱ्या रामासम विभूती बनवणं मात्र थांबवलंय!
सायंकाळ होताच चालू होतात
जगद्नियंत्याची आचमनं
सागर लाटावर खेळणारी लाल-नारिंगी किरणं
भासवितात जणू मद्यांनं हिंदकळणारा प्याला
अन गरज नसतानाही उभा असतो,
‘Ice
Sir?‘
म्हणून बिचारा हिमालय भोळा!
No comments:
Post a Comment